इयत्ता चौथी २०२०/२१

E:\photoshop my\rollover.html

Sunday 10 July 2016

दप्तराचे ओझे - निकष

इयत्तावार दप्तराच्या ओझ्याचे निकष पुढीलप्रमाणे आहेत*

💼 *१ली-२  किलो १०ग्रॅम

👜 *२री- २ किलो ३५ ॅम

🛍 *३री - २ किलो ५०५ग्रॅम*



👛 *४थी - २ किलो८३०ग्रॅम

👝 *५वी - ३ किलो१९५ग्रॅम

💼 *६वी - ३ किलो२९५ग्रॅम



🛍 *७वी - ३ किलो७८५ग्रॅम

👜 *८वी - ४  किलो२४५ग्रॅम

Thursday 7 July 2016

गुगल मॅप - प्रवासात उपयोगी पडणारे App

गुगल मॅप - प्रवासात उपयोगी पडणारे App
गुगल मॅप  (ऑफलाइन)   google-maps
विविध नॅव्हिगेशन गॅझेट्सच्या सहायाने प्रवास करणे ही आता नित्याची बाब झाली आहे. परंतु, प्रवासात प्रत्येक वेळी हॅण्डसेटला नेटवर्क मिळेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे मोक्याच्या क्षणी अडचणी उत्पन्न होतात आणि नॅव्हिगेशन गॅझेट जवळ असूनसुद्धा त्याचा फारसा उपयोग होत नाही. प्रवाशांच्या या अडचणीवर गुगलने तोडगा शोधला आहे. आता गुगल मॅप हे फिचर ऑफलाइन मोडमध्येसुद्धा ऑपरेट करता येणार आहे.
काही दिवसांपूर्वी युट्युबच्या ऑफलाइन व्हर्जनची गुगलने मोठ्या प्रमाणात जा​हिरात केली होती. त्याच धर्तीवर भारतातील युझर्ससाठी गुगलने 'गुगल मॅप'चे ऑफलाइन व्हर्जन लाँच केले आहे. भारतातील अनेक युझर्स अजूनही टूजी आणि थ्रीजी नेटवर्कवरच आहेत. त्यामुळे डाउनलोडिंग करताना कनेक्टिव्हिटीसोबतच स्पीडचीही समस्या असते. या अडचणींवर मात करुन ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी तंत्रज्ञान कंपन्या भरपूर मेहनत घेत आहेत. सातत्याने 'नवे काही तरी' शोधण्याच्या या प्रयत्नांमधूनच गुगल मॅपच्या ऑफलाइन व्हर्जनची संकल्पना पुढे आली आहे. इंटरनेट जगतात 'गुगल'हा परवलीचा शब्द आहे. व्यक्तींपासून रस्त्यांपर्यंत कुठलीही गोष्ट गुगलवर शोधता येते हा विश्वास सर्वसामान्य युझर्सला आहे. गुगलचा मोठ्या प्रमाणात वापर होत असला तरी कनेक्टिव्हिटीसारख्या समस्यांमुळे प्रवासादरम्यान गुगल मॅप फारसे प्रभावी ठरत नव्हते. आता मात्र 'ऑफलाइन गुगल मॅप' ही अडचण दूर करणार आहे.
'आतापर्यंत गुगलवरून नियोजित रस्ता शोधण्यासाठी चांगले इंटरनेट कनेक्शन गरजेचे होते. मात्र, आता ठिकाणे शोधणे, रस्त्यांची निवड करणे या बाबी सोप्या होणार आहेत. गुगल मॅपच्या ऑफलाइन व्हर्जनचा भारतातील युझर्सना चांगला फायदा होईल, अशी आम्हाला आशा आहे,' असे गुगल मॅपचे संचालक सुरेन रुचेला यांनी सांगितले.


आपल्याला ज्या भागातून प्रवास करायचा असेल त्या भागाचा नकाशा अॅण्ड्रॉइड स्मार्टफोनवर डाऊनलोड करायचा आणि प्रवासाच्या वेळी इंटरनेट कनेक्ट न करताही रस्ता शोधायचा, अशी ऑफलाइन गुगल मॅपची कार्यपद्धती आहे. गुगल मॅप ऑफइलान सध्या केवळ अॅण्ड्रॉइडवर उपलब्ध असून आयओएस व्हर्जन लवकरच उपलब्ध होणार आहे.

EXEMPLUS : पालकांसाठी मुलांचा अभ्यास घेण्यासाठी मार्गदर्शक APP

 EXEMPLUS : पालकांसाठी मुलांचा अभ्यास घेण्यासाठी मार्गदर्शक APP
 (exemPlux) असे या अॅपचे नाव असून त्याने पालकांना आपल्या मुलांना कोणत्या पद्धतीने शिकवावे यासाठी मदत केली आहे. 

प्रत्येक मुलाची शिकण्याची आपली वेगळी पद्धत असते. काही जण व्हिडिओ किंवा चित्र पाहून शिकतात, त्याला व्हिज्युअल स्पेशल म्हणतात. तर काही संगीत आणि ऑडिओच्या माध्यमातून पकटन गोष्ट ध्यानात घेतात, त्यांना म्युझिकल रिदमिक आणि हार्मोनिक म्हणतात. काही मुलं अॅक्टिविटीतून शिकतात त्यांना ब़ॉडी किनिस्थॅटिक म्हणतात. 

एक्समप्लक्स (exemPlux)च्या माध्यमातून पालक आपल्या मुलाचा लर्निंग पॅटर्न जाणून घेऊ शकतात. त्यासाठी या एक्समप्लक्समध्ये ११ प्रश्न आहेत. त्याची उत्तर देण्यासाठी केवळ ३ मिनिटंच लागतात. 

प्रत्येक प्रश्न हा शास्त्रीय पद्धतीने निवडण्यात आला आहे. एक शास्त्रीय फॉर्म्युला वापरून त्याचा रिझर्ल्ट काढण्यात येतो. हा रिझर्ल्ट पालकांनी दिलेल्या उत्तराच्या आधारावर काढण्यात येतो. त्यामुळे योग्य उत्तर देऊन आपल्या मुलाचा लर्निग पॅटर्न जाणून घेता येतो. 

हे अॅप ६ ते १८ वयोगटातील मुलांसाठी उपयोगी पडणारे आहे. हे फ्री मोबाईल अॅप वापरून पालक आपल्या मुलांचा लर्निंग पॅटर्न सहज जाणून घेऊ शकतात. तसेच आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाला योग्य दिशा देऊ शकतात. 

हे फ्री मोबाईल अॅप सी ३ सोल्यूशन या मुंबईतील कंपनीने डेव्हलप केले आहे. तसेच या अॅपसाठी प्रश्नावली बॉक्स ३ लर्निंग पुणे यांनी तयार केली आहे. 

युजर्स exemPlux गुगल प्ले स्टोअरवरूनही इन्स्टॉल करू शकतात. किंवा खालील लिंकवरून डाऊनलोड करा. 

CONTACT बॅकअप



मोबाइलमधून आपोआप कॉन्टॅक्ट्स डीलिट होणे ही अनेकांसाठी नेहमीची समस्या आहे. परंतु, ऑटोमॅटिक बॅकअप घेऊन ठेवल्यास हा प्रश्न नेहमीसाठी सुटू शकतो. कॉन्टॅक्ट्सचा बॅकअप घेण्यासाठी विविध अॅप्स बाजारात उपलब्ध आहेत.

  • अॅण्ड्रॉइडसाठी सुपर बॅकअप
सुपर बॅकअप हे वापरण्यासाठी अत्यंत सोपे अॅप असून त्याद्वारे कॉन्टॅक्ट्स आणि एसएमएसचा बॅकअप घेता येतो. या अॅपमुळे कॉन्टॅक्ट्स आपोआपच मोबाइलच्या इंटर्नल मेमरीमध्ये सेव्ह होतात आणि त्याच पद्धतीने हे कॉन्टॅक्ट्स गुगल ड्राइव्हवरही अपलोड करता येतात. तुम्ही नियमितपणे काँटॅक्ट्स अपडेट करत असाल तर यात बॅकअपचे ऑटोमॅटिक शेड्युलिंगसुद्धा करता येते. हे अॅप अॅड सपोर्टेड आहे. परंतु, सुपर बॅकअप प्रो नावाचे अॅप विकत घेऊन या अॅड रीमुव्ह करता येतात.

  •  आयओएससाठी माय कॉन्टॅक्ट्स बॅकअप प्रो
हे एक अत्यंत उपयोगी अॅप आहे. सोपे बॅकअप आणि रीस्टोरेशनबरोबरच यात अनेक उपयुक्त फीचर्स आहेत. या अॅपचा बॅकअप थेट इमेलवर येतो आणि ड्रॉपबॉक्सवरही सेव्ह होतो. त्याशिवाय वायफायद्वारे कॉन्टॅक्ट्स मॅनेज करता येतात, नियमित बॅकअपसाठी रीमाइंडर सेट करता येतो आणि रीमूव्हसुद्धा करता येतो.


  • विंडोजसाठी कॉन्टॅक्ट्स बॅकअप
विंडोज फोनमधील बिल्ट इन बॅकअप कॉन्टॅक्ट्सला बॅकअप करत नाही. कॉन्टॅक्ट्स बॅकअपच्या सहायाने आपल्या अकाउंटमधील कॉन्टॅक्ट्ससोबतच त्यांच्या फोटोचाही बॅकअप घेता येतो. यासाठी कॉन्टॅक्ट्स बॅकअपला वनड्राइव्ह स्टोअरेजचा अॅक्सेस देणे आवश्यक असते.


  • ब्लॅकबेरीसाठी फ्री कॉन्टॅक्ट बॅकअप बाय अजनी इन्फोटेक
या अॅपच्या सहायाने ब्लॅकबेरी १० मध्ये केवळ एका टॅपद्वारे बॅकअप घेता येतो. यातून काही निवडक ‌कॉन्टॅक्ट्स किंवा मोबाइलमधील सर्वच्या सर्व कॉन्टॅक्ट्सचाही बॅकअप घेता येतो. यात डुप्लिकेट कॉन्टॅक्ट्सचा बॅकअप घेण्याचा किंवा ते थेट मेलवर पाठवण्याचाही पर्याय उपलब्‍ध आहे. जुन्या ब्लॅकबेरी फोन्ससाठी अमाइरा सॉफ्टद्वारे निर्मित बॅकअप कॉन्टॅक्ट्स अॅप उपयुक्त आहे.


  • कॉन्टॅक्ट्स ट्रान्‍स्फर करणे
एका फोनमधून दुसऱ्या फोनमध्ये कॉन्टॅक्ट्स ट्रान्‍स्फर करण्याची अनेक कारणे असू शकतात. एचटीसी, लिनोवो, सॅमसंग आणि एलजी सारख्या कंपन्यांचे कॉन्टॅक्ट्स ट्रान्स्फर करण्यासाठी स्वतंत्र अॅप आहेत. इतर फोन्ससाठी चांगले अॅप्स उपलब्‍ध आहेत.


  • इनटच अॅप
अॅण्ड्रॉइड, ब्लॅकबेरी आणि आयओएस या मोबाइल्ससाठी इनटच अॅप नि:शुल्क आहे. या अॅपद्वारे कॉन्टॅक्ट्स ट्रान्‍स्फर करण्यासाठी मात्र पैसे मोजावे लागतात. या अॅपमुळे एका फोनमधील कॉन्टॅक्ट्स तुम्ही वापरत असलेल्या इतर कुठल्याही फोनवर वायफाय किंवा डाटा कनेक्‍शनच्या सहायाने पाहता येऊ शकतात.


  • फोनकॉपी
या अॅपची क्षमता ५०० कॉन्टॅक्ट्सची असून अॅण्ड्रॉइड, ब्लॅकबेरी, आयओएस, सिम्बियन आणि विंडोज फोनसाठी ते नि:शुल्क आहे. एका मोबाइलवरून फोनकॉपीवर कॉन्टॅक्ट्सचा बॅकअप घेतला की तुम्ही वापरत असलेल्या इतर सर्व फोन्सवर ते कॉन्टॅक्ट्स उपलब्‍ध राहतात. फोनकॉपीचे एक प्रिमियम व्हर्जन उपलब्‍ध असून त्याचे शुल्क प्रतिवर्षाला २५ अमेरिकी डॉलर्स असे आहे.


  • डेस्कटॉप सॉफ्टवेअर
डेस्कटॉप मॅनेजर किंवा फोनच्या सॉफ्टवेअर सूटच्या सहायाने कुठल्याही स्मार्टफोनला मायक्रोसॉफ्ट आउटलूकशी जोडता येतं. एकदा हे कॉन्टॅक्ट्स आउटलूकशी जोडले गेले की त्यांचे रुपांतर एका फाइलमध्ये होते आणि ते इमेल कॉन्टॅक्ट् लिस्टशीही जोडले जातात. ज्या ज्या वेळी इमेल आयडीने तुम्ही एखाद्या स्मार्टफोनवर लॉगइन कराल त्या त्या वेळी त्या स्मार्टफोनवर हे कॉन्टॅक्ट्स उपलब्‍ध राहतील. याशिवाय मोबाइलट्रान्स या अॅपद्वारेही कॉन्टॅक्ट्स ट्रान्स्फर करता येतात.


  • कम्प्युटरवरून कॉन्टॅक्ट्स मॅनेज करणे
तुमच्याकडे अॅण्ड्रॉइड फोन असेल तर कम्‍प्युटरवरुनही कॉन्टॅक्ट्स मॅनेज करता येतात. यासाठी एअरड्रॉइड हे सर्वांत उपयुक्त टूल आहे. हे अॅप डाउनलोड केल्यास कॉन्टॅक्ट्स ट्रान्स्फर, डाटा ट्रान्स्फर इत्यादी सहजतेने करता येते. शिवाय ब्राऊझरवरून कॉन्टॅक्ट्स अपलोड किंवा डीलिट करता येतात.






धन्यवाद                                                                                                                                  
माहिती साठी संकलन 
animated-boy-image-0053स्कूल चले हम!
animated-arrow-image-0023
सर्व कविता लिंक
��मराठी इयत्‍ता पहिली  
download

��मराठी इयत्‍ता दुसरी 
download

��मराठी इयत्‍ता तिसरी
download
 
 ��मराठी इयत्‍ता चौथी
download

 ��मराठी/हिंदी  इयत्‍ता पाचवी
downlod

��मराठी/हिंदी  इयत्‍ता सहावी
download

��मराठी/हिंदी  इयत्‍ता सातवी
download

आणि

 ✈��इंग्रजी इयत्‍ता पहीली
download

��इंग्रजी इयत्‍ता दुसरी
download

��इंग्रजी इयत्‍ता तिसरी
download

��इंग्रजी इयत्‍ता चौथी
download

��इंग्रजी इयत्‍ता पाचवी
download

��इंग्रजी इयत्‍ता सहावी 
download

��इंग्रजी इयत्‍ता सातवी 
download

सर्व कविता  सहज download करूया
सौजन्य back to zp school 
Sandip Khandagale