इयत्ता चौथी २०२०/२१

E:\photoshop my\rollover.html

Online MESSAGE सेव करणे


                What's app, hike, Facebook या वरील Text message ( लिखित मेसेज) ppt files, words doc, Excel files, video, कायमस्वरूपी (permanently)अॉनलाईन Save कसे ठेवायचे ??? 
        
                 🙏नमस्कार मित्रांनो 🙏
    तुमचे whatsapp, hike, Facebook यावरील मेसेज कायमस्वरूपी ( म्हणजे अगदी तुमचा मोबाईल बंद पडला किंवा काही कारणाने खराब जरी झाला तरीही )अॉनलाईन Save करण्यासाठी Dropbox आणि Google drive, WPS office व इतरही पर्याय उपलब्ध आहेत. पण आज आपण फक्त आणि फक्त Dropbox या apps मध्ये मेसेज कसे जतन ठेवायचे याविषयी माहिती पाहुया.
        
                @ Dropbox @
       🍀💥🍀💥🍀💥🍀💥🍀
    Dropbox चा विचार फक्त मेसेज Save करण्यासाठी आहे असा संकुचित विचार करणारा मीही नाही. किंवा तुम्हीही करू नका. मित्रांनो तंत्रज्ञानाचा काळ आला आहे. आणि या काळात आपल्याला तंत्रज्ञानविषयी निरक्षर राहून चालणार नाही. आता आपल्याला Dropbox ची संपूर्ण माहिती बघायची आहे.
    
          @ Dropbox ची वैशिष्ट्ये @
1) इंटरनेट वरील विविध गोष्टी Download करून ठेवण्यासाठी उपयोग होतो. For exa. Pdf, video, audio, ppt and other files.
2) माहिती अॉनलाईन Save राहते. ती तुम्ही कधीही पाहू शकता. किंवा आपल्या PC, laptop, SD card, pendrive मध्‍ये transfer करू शकता.
3) माहिती अॉनलाईन Save असल्यामुळे मेसेज असेल किंवा pdf, Excel files, video, ppt, words doc, कधीही नष्ट होण्याची, खराब होण्याची भीती मनात राहणार नाही.
4) अगदी तुमची खाजगी माहिती सुद्धा सुरक्षित राहू शकते.
5) याशिवाय यामध्ये आपण Save केलेल्या गोष्टी edit पण करता येतात.
6) तुमचा मोबाईल बंद पडला किंवा काही कारणाने खराब झाला किंवा format करावा लागला तर पुन्हा मोबाईल घेतल्यावर किंवा मोबाईल दुरूस्ती केल्यावर dropbox हे apps पुन्हा नव्याने install करून sign up केले की आपली dropbox मध्ये Save करुन ठेवलेली माहिती पुन्हा मोबाईल मध्ये येते. आणि आपण तिचा पूर्वीप्रमाणेच उपयोग करू शकतो.
           मग आहे की नाही dropbox मस्त मित्रांनो.....................??.     
      चला आता प्रत्यक्ष कार्यवाही कशी करायची ते पाहुया. आपल्याकडे यापूर्वीच dropbox असेल तर प्रश्नच नाही. पण ज्या मित्रांकडे अद्यापही dropbox नाही त्यांनी मी सांगतो ती खालील कृती अगोदर करून घ्या.

1) playstore किंवा MoboMarket मधून dropbox apps डाउनलोड करून घ्या व मोबाईल मध्ये install करून ते open होते की नाही याची खात्री करून घ्या.
2) लगेच त्याचे कार्य सुरू होणार नाही.  त्याचे कार्य सुरू करण्यासाठी तुम्हाला sign-up करावे लागेल. घाबरून जाऊ नका. एकदम सोपं आहे. तुमच्या मोबाईल स्क्रीन वर
 * Dropbox ला touch करा त्यानंतर
 * sign-up ला टच केल्यावर
* तुमचे first name, last name आणि
*  सर्वात महत्वाचे तुमचा permanent Email address व Password टाकावा.
* त्यानंतर create account ला टच करा.
 ( पण थोडं थांबा...... कारण account create होण्यासाठी आपला नेट data सुरू आहे का हे पाहून घ्या. कारण नेट डेटा चालू असेल तरच account create होईल.)
* Terms service मध्‍ये I agree ला टच करा.
* includes video ला टच करा.
* skip ला टच केले की झाले dropbox चे कार्य सुरू..........
           अबब ! तुम्ही म्हणाल की किती अवघड आहे हे...... पण तुम्हाला तंत्रस्नेही बनायचे आहे ना.............? मग या गोष्टी तर कराव्याच लागतील. आणि हे एकदाच करायचे आहे हे लक्षात असू द्या.
   🍀💥🍀💥🍀💥🍀💥🍀
        आता मेसेज किंवा इतर कोणत्याही गोष्टी Save करण्यासाठी कृती पाहूया.
1) प्रथमतः what's up, hike किंवा Facebook वरील मेसेज किंवा इतर डाटा copy करून बाहेर या.
2) dropbox ला touch करा. Dropbox मध्ये खालील कोपर्‍यात +( अधिक) च्या चिन्ह टच करा.
3) तुम्हाला 3/4 options दिसतील. तुमचा copy केलेला मेसेज लिखित स्वरूपात असेल तर create new text file वर टच करा.
4) नवीन पेज दिसते त्याच्या पहिल्या ओळीत थोडा वेळ टच करून ठेवले की paste options येईल. त्याला टच केले की तुमचा मेसेज आपोआप दिसू लागेल.
5) आता वरच्या कोपर्‍यातल्या तीन टिंबावर टचिंग करा व मेसेज Save करुन टाका. तुम्हाला file name विचारले जाईल.त्यात आवडीने नाव टाकून OK करा.
    Same हीच process video, photo, other files साठी वापरा. पण वापरताना text, video साठी वेगवेगळे options चा वापर करावा. मी आणखी सगळंच सांगितले तर तुमचा आनंद कसा वाढणार...........?  खरं आहे ना मित्रांनो................
          @ very important गोष्ट @

       Dropbox मध्ये लिखित मेसेज किंवा इतर कोणत्याही गोष्टी Save करण्यासाठी तुमचा नेट डाटा चालू असेल तरच मेसेज permanently ( कायमस्वरूपी) save होईल अन्यथा नाही हे लक्षात असू द्या. यासाठी तुमचा थोडासा डाटा एकदाच खर्ची पडेल. पण तुमचा मेसेज जोपर्यंत जगात dropbox आणि Internet असेल तोपर्यंत Save राहिल हे ध्यानात ठेवा. आणि त्याचा तुम्हाला स्वतःला कायम उपयोग होईल. 

No comments:

Post a Comment

animated-boy-image-0053स्कूल चले हम!
animated-arrow-image-0023
सर्व कविता लिंक
��मराठी इयत्‍ता पहिली  
download

��मराठी इयत्‍ता दुसरी 
download

��मराठी इयत्‍ता तिसरी
download
 
 ��मराठी इयत्‍ता चौथी
download

 ��मराठी/हिंदी  इयत्‍ता पाचवी
downlod

��मराठी/हिंदी  इयत्‍ता सहावी
download

��मराठी/हिंदी  इयत्‍ता सातवी
download

आणि

 ✈��इंग्रजी इयत्‍ता पहीली
download

��इंग्रजी इयत्‍ता दुसरी
download

��इंग्रजी इयत्‍ता तिसरी
download

��इंग्रजी इयत्‍ता चौथी
download

��इंग्रजी इयत्‍ता पाचवी
download

��इंग्रजी इयत्‍ता सहावी 
download

��इंग्रजी इयत्‍ता सातवी 
download

सर्व कविता  सहज download करूया
सौजन्य back to zp school 
Sandip Khandagale