इयत्ता चौथी २०२०/२१

E:\photoshop my\rollover.html

‘अनुभूतीतून आत्मनिर्भरता’



जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाळुंगे पडवळ,

तालुका -आंबेगाव, जिल्हा- पुणे

शाळास्तरावरील उपक्रम
‘अनुभूतीतून आत्मनिर्भरता’

प्रास्ताविक:
या उपक्रमाद्वारे विविध व्यावसायिक, उद्योजक, लेखक, कवी, कलाकार, शिक्षक अशा आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना शाळेत मार्गदर्शनाखाली बोलावण्यात आले. सहज उपलब्ध होतील अशा व्यक्तींची निवड केली. प्राधान्याने शाळेतील माजी विद्यार्थी व विविध क्षेत्रात पारंगत असणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यात आली. ज्यांनी आपल्या शिक्षणाचा वापर करून विविध क्षेत्रात कशा रीतीने यशस्वी झालो याविषयी मार्गदर्शन घेतले. व त्यांच्या क्षेत्राविषयी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून तज्ञांकडून माहिती घेतली.
उपक्रमाचे स्वरूप:
1. तज्ञांची / व्यवसायिकाची निवड:
2. वेळ व कालावधी
3. मानधन/ खर्च
4. प्रकल्पातून विद्यार्थ्यांना मिळालेले फायदे
5. मान्यवरांकडून शाळेलेला झालेले फायदे

तज्ञांची / व्यवसायिकाची निवड:
    प्रामुख्याने विद्यार्थ्यांना सर्व व्यवसायांची, कलाकारांची ओळख व्हावी म्हणून गावातील प्रगतशील व्यवसायिक, स्थानिक कलाकार, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली. शाळेतील माजी विद्यार्थी असल्याने शाळेबद्दल आवड असणाऱ्या व्यक्तींनी सहज उपलब्धता दर्शवली.
       आपला शाळेने मान-सन्मान केला. त्यामुळे शाळेसाठी आपल्याकडून कोणतीही मदत करण्यास सहमती दर्शवली व त्यांच्या विषयाशी संबंधीत वस्तू विद्यार्थी अगर शाळेसाठी मदत करण्यास तयार झाले. एकंदर मुलाखतीतून व्यावसायिक यांची माहिती मिळाली व त्याच बरोबर शाळेलाही मदत मिळाली.

आतापर्यंत बोलाविण्यात आलेले व्यावसायिक:

1. वीट व्यावसायिक / कुंभार-
2. कुक्कुटपालन करणारे
3. प्रगतशील शेतकरी
4. प्रसिद्ध लेखक
5. विज्ञान शिक्षक
6. आदर्श शिक्षिका
7. प्रसिद्ध कवी
8. माजी जिल्हा परिषद सदस्य / सरपंच
9. वृद्ध कवयत्री आजी (मनातील कविता)
10. उपक्रमशील शिक्षक
11. जेसीबी चालक
12. शिक्षण तज्ञ /सेवानिवृत्त शिक्षक (राज्य आदर्श शिक्षक)
13. संगणकतज्ञ
14. सामाजिक कार्यकर्त्या
15. रेल्वे मोटरमन
16. सेवानिवृत्त बँक अधिकारी
17. उपक्रमशील शिक्षिका (कलाकार)

वेळ व कालावधी:
सदर व्यक्तींच्या मुलाखती दर शनिवारी ९ ते १०.३० या वेळेत घेण्यात आल्या. प्रत्येक तज्ञासाठी आपल्या व्यवसाय अगर आपल्या विषयाचे सादरीकरण करण्यासाठी एक तास एवढा कालावधी देण्यात आला.प्रथम आलेल्या मार्गदर्शकाने आपल्या क्षेत्राविषयी आपल्या विषयाविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी सांगितले जाते. तद्नंतर प्रश्नोत्तरे घेतली जातात. त्यांच्या उद्योग, कला, विषयाशी संबधित प्रश्न विचारून विद्यार्थी माहिती घेतात. आपले शाळेतील शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन घेतले. तद्नंतर अर्धा तास विद्यार्थी त्यांना त्यांच्या विषयाशी संदर्भित प्रश्न विचारले. तज्ञांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले व प्रश्नांची उत्तरे दिली.

मानधन/ खर्च:

तज्ञ परिसरातील असल्याने सहज उपलब्ध होणारे होते. तज्ञांना कोणताही खर्च अगर
मानधन देण्यात आले नाही. याच तज्ञांनी प्रत्येक वेळी स्वत:हून शाळेसाठी मदत केली.
प्रकल्पातून विद्यार्थ्यांना मिळालेले फायदे:
हा प्रकल्प खूपच प्रभावी होता. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्वावर त्याचा चांगला परिणाम
होवू लागला. विद्यार्थी आवडीने शनिवारची बिनदप्तराची शाळेची वाट पाहू लागले.
1) कुक्कुट पालन करणाऱ्या व्यक्तीने विद्यार्थ्यांना खावू साठी ५०० अंडी मोफत दिली.
2) लेखकांनी मुलांना वाचनासाठी मोफत पुस्तके दिली.
3) प्रगतशील शेतकऱ्याने कशा मुलांना खाऊ साठी केळी भेट दिली.
4) काही मान्यवरांनी मुलांना खावूसाठी रोख पैसे देणगी दिली.
5) लेखाकांनी कथा तयार करतात करतात याविषयी मार्गदर्शन केले.
6) कवींनी कविता कशा करायच्या याविषयी माहिती दिली.
7) शिक्षण तज्ञांनी विविध विषयावर मूल्यशिक्षणावर मार्गदर्शन केले.
8) कलाकारांनी विविध नाटकात अभिनय, नृत्य कसे करायचे याविषयी मार्गदर्शन केले.
9) विविध व्यवसायिकांनी / अधिकार्यांनी आपल्या क्षेत्रातील ज्ञान, माहिती दिली. उदा.
बँक, जेसीबी, संगणक शिक्षण, वीट व्यवसाय, पोल्ट्री व्यवसाय इ.
10) शाळेतील शिक्षणाबरोबरच अवांतर शिक्षण व नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.
11) विविध तज्ञांना प्रश्न विचारण्याची संधी मिळाली त्यामुळे सभाधीटपणा वाढला.
12) आनंददायी पद्धतीने शिकायला मिळाले.
13) शाळेतील उपस्थितीचे प्रमाण वाढले.
14)प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रत्येक विद्यार्थी प्रगत होण्यासाठी जे २५  निकष आहेत, त्यात विद्यार्थी स्वतःहून काही शब्द दिले असता गोष्ट तयार करणे, कविता तयार करणे या गोष्टी शिकला.
15)ज्ञानरचनावादाचा अवलंब करण्यास शिकले.
16) नवनवीन व्यक्तिमत्वांना भेटण्याचा योग आला.

मान्यवरांकडून शाळेलेला झालेले फायदे:
स्थानिक व्यावसायिकांनी आपापल्या परीने विद्यार्थ्यांना व शाळेला मदत केली. व
भविष्यात ही गरज पडेल तेव्हा मदत करण्याचे अश्वासन दिले.
1. वीट व्यवसायिकाने शाळेतील ओला कचरा सुका कचरा टाकण्यासाठी कचराकुंडी
बांधण्यासाठी मोफत विटा दिल्या.
2. कचराकुंडी बांधण्यासाठी खड्डा मोफत जेसीबी मालकाने करून दिला.
3. लेखक, कवी व शिक्षकांनी मोफत शाळेतील वाचनालयासाठी मोफत पुस्तके दिलीत.
4. विविध उद्योजकांनी आर्थिक स्वरुपात शाळेला देणगी दिली.
5. शाळेबद्दल पालकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.
6. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी शाळा म्हणून नावारूपाला शाळा आली.
7. शिक्षकांमध्ये प्रेरणा व उत्साह आला.
8. शाळेसाठी लोकसहभाग वाढला.
9. पालकांचा शाळेसाठी सक्रीय मदत मिळाली.
पुष्प-१
दिनांक १६ डिसेंबर २०१७
पोल्ट्री व्यावसायिक मुकुंद बारवे, वीट व्यावसायिक अशोक भालेराव, प्रसिध्द शेतकरी विकास डोके 
यांच्याशी साधला विद्यार्थ्यांनी संवाद
            महाळुंगे पडवळ येथे 'अतिथी निदेशक' म्हूणन गावातील प्रसिद्ध व्यावसायिक यांच्याशी विद्यार्थ्यांनी साधला संवाद
जि.प.प्राथमिक शाळा महाळुंगे पडवळ येथे गावातील प्रसिद्ध व्यावसायिक यांना बोलाविण्यात आले होते. ते आपल्या व्यवसायात कसे यशस्वी झाले या संदर्भात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या व्यवसायात कशा पद्धतीने खडतर मेहनत घेतली याबद्दल सविस्तर माहिती दिली.
           यासाठी गावातील पोल्ट्री व्यावसायिक मुकुंद बारवे, वीट व्यावसायिक अशोक भालेराव, प्रसिध्द शेतकरी विकास डोके यांना बोलाविण्यात आले होते. आपले मनोगत व्यक्त करतांना मुकुंद बारवे म्हणाले, "आपले काम मनापासून करा. काम कोणतेही असो ते करताना लाज बाळगू नका. आपल्या व्यवसायात आपण स्वतः जर निष्ठेने झोकून देऊन काम केले तर यश निश्चित आपल्याला लाभेल. काम करताना कामगारांवर अवलंबून राहू नका. स्वतः त्यात सहभागी झाल्यामुळेच मी आज यशस्वी उद्योजक होऊ शकालो."



 वीट व्यावसायिक अशोक भालेराव


पोल्ट्री व्यावसायिक मुकुंद बारवे




प्रसिध्द शेतकरी विकास डोके 









--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------



पुष्प २
दिनांक  २३ डिसेंबर २०१७
'लेखक आपल्या भेटीला' उपक्रमांतर्गत जुन्नर येथील प्रसिध्द लेखक व कवी मा.श्री उत्तम सदाकाळ यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
        विद्यार्थ्यांसमोर त्यांनी विविध कथा व कविता सादर केल्या. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ज्ञानरचनावादाचा अवलंब करून विद्यार्थ्यांना स्वतः कथा व कविता निर्मिती करावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांना कथा व कविता यांची निर्मिती कशी करावी या विषयी अनेक प्रश्न विचारले, विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे व सखोल मार्गदर्शन मा. उत्तम सदाकाळ यांनी केले.


         दै. सकाळ मध्ये विविध विनोदी कथा व लेख प्रसिध्द झालेले आहेत. आजपर्यंत 80 पेक्षा अधिक पुस्तकांचे लेखन केलेले आहे. 350 पेक्षा अधिक कवितांची निर्मिती केली आहे. ग्रामीण भागातील या लेखकाचे यावर्षी 44 दिवाळी अंकांमध्ये लेखन प्रसिध्द झाले आहे.







मा. उत्तम सदाकाळ कथाकथन करताना 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------

मा. उत्तम सदाकाळ, 'कविता गायन' करताना

 जि.प.शाळा महाळुंगे पडवळ येथे















--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


पुष्प ३
दिनांक २९ डिसेंबर २०१७
'विज्ञानातील गमती जमती'
'विद्यार्थ्यांनी जिज्ञासूवृत्ती जोपासावी- रतिलाल बाबेल'


                जि.प.प्राथमिक शाळा महाळुंगे पडवळ येथे 'विज्ञानातील गमती जमती' या विषयी व्याख्यान देताना बोलत होते.

विद्यार्थ्यांशी साधला संवाद साधताना बाबेल सर म्हणाले, "विद्यार्थ्यांनी आपल्याला सतत काही ना काही प्रश्न पडत असतात ते मनात दाबून न ठेवता विचारले पाहिजे. जिज्ञासूवृती जोपासून आजूबाजूला विविध घडामोडी घडत असतात, हे कसे घडते हे जाणून घेतले पाहिजे. सध्या इंधन समस्या आपल्याला सतत जाणवत आहे, तेव्हा सौर उर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जा स्तोत्राचा वापर केला पाहिजे, सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त करून विविध यंत्रे, अवजारे तयार करण्याचे आव्हान पुढील काळात तुमच्या समोर आहे. तसेच पाणी व वीज यांचा जपून केला पाहिजे. विज्ञानाला अध्यात्माची जोड असावी. आपले आई, वडील, शिक्षक, समाज, देश याबद्दल आदर व अभिमान असावा. वडीलधाऱ्या व्यक्तींचा नम्रपणे वागले पाहीजे."

विविध शास्त्रज्ञांच्या गोष्टी व ते शास्त्रज्ञ कसे झाले हे सांगितले प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ज्ञानरचनावादाचा अवलंब करून विद्यार्थ्यांना स्वतः सर्जनशील व्हावे या साठी विविध छोटे छोटे प्रयोग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी विज्ञानातील अवघड वाटणारे या विषयी अनेक प्रश्न विचारले, विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे व सखोल मार्गदर्शन मा. रतिलाल बाबेल सर यांनी दिली. 

      तसेच बाबेल सरांच्या संकल्पनेतून डॉ.कलाम विचार मंचाच्या वतीने 24 विज्ञान व मूल्य शिक्षणाची पुस्तके शालेय विद्यार्थ्यांना भेट दिली. तसेच मुलांसाठी खाऊसाठी 500/- भेट दिले.

      रतिलाल बाबेल सर सातत्याने शिक्षण क्षेत्रारतील विविध संस्था शाळा यांना भेटी देऊन स्व. रामचंद्र बाबेल ट्रस्ट च्या वतीने शाळानां मदत करत असतात व उपक्रमशील शिक्षकांना गौरवित असतात.












--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुष्प ४
दिनांक २९ डिसेंबर २०१७
बालिका दिन साजरा करणे
मा.सौ.मानिषाताई कानडे -  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले - व्याख्यान 
 श्रीमती राजश्री तिटकारे- 'मी सावित्रीबाई बोलतेय'- एक पात्री प्रयोग
          अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या दीन दलित महिलांना दैदीप्यमान मार्ग दाखविणारी खरी विद्येची देवता असणाऱ्या आद्य स्त्री समाजसुधारक स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भारतातील
पहिल्या 'शिक्षका', 💥पहिल्या  'मुख्याध्यापिका',💥'पहिल्या "संस्थापिका',"ज्ञानज्योती", "क्रांतीज्योती" '💥महानायिका' सावित्रीबाई फुले यांची 187 वी जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाळुंगे पडवळ येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी शाळेत बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुलांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी भाषणे सादर केली. त्यानंतर मा.सौ.मानिषाताई कानडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व्याख्यान दिले. स्री शिक्षणाचे महत्व व सावित्रीबाईनी केलेल्या कार्याची महती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. या प्रसंगी मानिषाताई कानडे म्हणाल्या, "जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी. सावित्रीबाईनी आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून समर्थपणे स्री शिक्षणाचे महान कार्य केल्यामुळे आज समाजात महिला विविध क्षेत्रात आघाडीवर आहे." या दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मानिषाताई कानडे यांनी लिहिलेले, *'सेवाव्रती फुले दांपत्य'* व सानेगुरुजी यांची पुस्तके व विद्यार्थ्यांना खाऊसाठी 500/- दिले.
यानंतर श्रीमती राजश्री तिटकारे यांनी *'मी सावित्रीबाई बोलतेय'* हा एकपात्री प्रयोग सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
*"ज्ञानज्योती", "क्रांतीज्योती"*




*💥महानायिका*💥 
*सावित्रीबाई फुले*

💐अ|भि|वा|द|न💐
 !!जय ज्योती, जय क्रांती!! 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुष्प ५
दिनांक २९ डिसेंबर २०१७
            जि. प. शाळा महाळुंगे पडवळ येथे अवतरल्या साक्षात बहिणाबाई, अर्थात गावच्या उपसरपंच मीराताई डोके, जेमतेम सातवी पर्यंत शिक्षण असणाऱ्या ह्या आजी. मुलांना आपल्या बालवयात शिकलेल्या कविता, गाणी, श्लोक यांची मेजवानीच मिळाली. तालबद्ध कविता गाऊन दाखविल्या व मुलांनाही म्हणायला लावल्या. गाण्यातून विद्यार्थ्यांनी भरपूर आनंद लुटला. व आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
             सोबतीला होते गावचे माजी सरपंच व जि. प. सदस्य दादाभाऊ चासकर 85 वर्षांचे तरुण आजोबा म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या वयातही अगदी ठणठणीत प्रकृती. या गावाची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना त्यांनी समजावून सांगितली. पूर्वी शाळा कशी होती, आता कसे बदल घडले. गावची पार्श्वभूमी कशी होती. आता शिक्षणाच्या भरपूर सुविधा उपलब्ध आहेत. परंतु पूर्वी देवळात, झाडाखाली शाळा भरत असायच्या. गावाला फार वर्षापासून शिक्षणाची परंपरा असल्याने येथील नागरिक सुशिक्षित व प्रगत आहे, यामागे शाळेचे अर्थात शिक्षणाचे योगदान आहे. ही शाळा १५० वर्षाची जुनी असून आंबेगाव तालुक्यातील पहिल्या चार तालुक्यातील एक शाळा आहे.
    या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध व्यावसायिक मा.सुनील वाळुंज यांनी आपल्या जेसीबी व्यवसायात कशी यशस्वी वाटचाल केली याविषयी माहिती दिली.


 video पाहण्यासाठी खालील link वर क्लिक करा.










--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुष्प ६
दिनांक ६ जानेवारी २०१८
काव्यांजली- कवी संदीप वाघोले
             "वाचनाने जीवन समृद्ध होते, वाचनसंस्कृती जोपासा", 'जू'कार कवी संदीप वाघोले
जि.प. प्राथमिक शाळा महाळुंगे पडवळ येथे *'काव्यांजली'* कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. कोणताही कलाकार, कवी किंवा लेखक हा सहज घडत नाही किंवा आपोआप निर्माण होत नाही तर तो घडण्यासाठी अखंड मेहनत, झोकून देण्याची वृत्ती व सातत्याने प्रयत्न केल्यावरच त्याच्या हातून एखादी चांगली कला निर्माण होते. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडणारी कोणतीही गोष्ट, छंद मनापासून जोपासा, तरच त्या क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल. लहानपणापासून विविध लेखक कवी यांची पुस्तके वाचनाची मला आवड होती. हाती पडलेले कोणतेही पुस्तक संपूर्ण वाचून होइपर्यंत मी ते खाली ठेवत नव्हतो, वाचनाची लहानपणापासून आवड असल्याने शाळेतील वाचनालायतील ७० टक्के पुस्तके पाच वर्षात मी वाचून काढली. वाचनामुळे विचार क्षमता, शब्दकौशल्य,भावविश्व, ज्ञान यामध्ये नक्कीच वाढ होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचनावर भर द्यावा.
       कवी संदीप वाघोले यांनी मुलांना विविध कविता, गाणी, पोवाडे म्हणून दाखविले. कविता निर्मिती कशी करायची या विषयी मार्गदर्शन केले.त्यांचा 'जू' हा काव्यसंग्रह सध्या विशेष गाजत आहे. या काव्यसंग्रहास राज्यभरातून ८ पुरस्कार प्राप्त झाले आहे. 
        कविता करताना तुमचे मन संवेदनशील असले पाहिजे, मानवी जीवनातील अनुभवातून, भावनेतून साकारणारी कविता मनाला भिडते.
शेतकरी म्हणजे शेतीवर उपजीविका करणारा,त्याला आयुष्यभर साथ देणारा असतो तो शेतीनिष्ठ, कृषकनिष्ठ सोबती 'बैल' बैलाच्या खांद्यावर औताची 'जू' असते, जर शेतकऱ्याच्या उरावर अवर्षणाची, नापिकतेची, दलालांच्या लालसेची 'जू' असते. याची प्रखर चीड, राग जिव्हारी लागलेली टोचणी जू काव्यसंग्रहात मांडलेली आहे. प्रत्येक कवित्यामधून अन्नदात्या शेतकऱ्याविषयी ही वेदना पाझरणाऱ्या विविध 'जू' काव्यसंग्रहातील कविता गाऊन दाखविल्या.


कवी संदीप वाघोले कविता गायन करताना.




--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुष्प ७ वे
दिनांक १२ जानेवारी २०१८
युवा दिन व राजमाता जिजाबाई जयंती  निमित्त 
आदेश गाडे यांचे व्याख्यान
        "थोर महापुरुषांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन तसे कार्य करण्याची उर्मी अंगी बाळगा," आदेश गाडे
जि.प.प्राथमिक शाळा महाळुंगे पडवळ येथे 'राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद जयंती ' कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

        राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद प्रत्येक घरातून घडले तरच त्यांची जयंती साजरी केल्याचे फलित होऊ शकेल.

ज्या काळात गोर गरीब रयतेवर जुलूम होत होता, त्याकाळात स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात पाहिले व प्रत्यक्ष अंमलात आणून रयतेचे राज्य निर्माण केले. शिवराय घडले ते राजमाता जिजाऊंच्या मुळेच. तसेच स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृती व साहित्य विदेशात पोहचविले, आध्यत्मिक ज्ञान हिंदू धर्माचे महत्व जगाला सांगितले. गरिबांच्या सेवेसाठी रामकृष्ण मिशन ची स्थापना केली.तसेच भारतीय तरुणांमध्ये कार्य करण्यासाठी उत्साह, जोश, प्रेरणा निर्माण केली म्हणून त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय युवादिन म्हणून साजरा केला जातो. या दोघांचे कार्य प्रेरणादायी आहे. असे मौलिक विचार या वेळी मा.आदेश गाडे यांनी मांडले.
या प्रसंगी मा.किसनराव सैद, जिजाभाऊ आवटे माजी ग्रा.पं.सदस्य उपस्थित होते.





व्याख्यान ऐकण्यासाठी खाली click करा.




--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुष्प ८ वे
                                                                                                               दिनांक १३ जानेवारी २०१८
'हसत खेळत शिक्षण' याविषयावर दिपक रोकडे सर यांची जि.प.प्राथ.शाळा महाळुंगे पडवळ येथे कार्यशाळा.
       उपक्रमशील शिक्षक दिपक रोकडे सर यांनी हसत खेळत शिक्षण' याविषयावर जि.प.प्राथ.शाळा महाळुंगे पडवळ येथे कार्यशाळा घेतली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणतज्ञ रामभाऊ सातपुते होते.

       विविध गाणी, कविता यावर प्रत्यक्ष गाऊन, नाचून सादर केल्या. व शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांना सोबत नाचून गाऊन म्हणायला लावल्या. सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला, अगदी 1ली ते 7वी पर्यंतच्या कवितांना चाली लावून दिल्या, विविध चित्रमय कथा, चित्रकला याविषयी हसतखेळत मार्गदर्शन केले. विद्यार्थी अगदी भान विसरून यात रममान झाले होते. अगदी मनमुराद आनंद लुटला.
      अध्यक्षीय भाषणात शिक्षणतज्ञ रामभाऊ सातपुते म्हणाले, मागील काही दिवसांपासून विविध तज्ञ, लेखक, कवी, उद्योजक, व्यावसायिक, उपक्रमशील शिक्षकांचे मार्गदर्शन दर शनिवारी होत असते. हा उपक्रम खरोखरच उत्कृष्ठ आहे, विद्यार्थ्यांना विविध कला, व्यवसाय, तज्ज्ञांचे मार्गदर्शन होत असते, यातूनच एखादा विद्यार्थी उत्तम वक्ता, कवी, लेखक उद्योजक होऊ शकेल. आपण सर्वांसाठी ही एक पर्वणी आहे, यातून ज्ञान आत्मसात करून नवीन काहीतरी वेगळे शिकण्याची संधी या शाळेतील शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती करून देत आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. असे नाविन्यपूर्ण उपक्रम चालू ठेवा. या साठी शुभेच्छा दिल्या.







दिपक रोकडे सर यांना ऐकण्यासाठी खाली click करा. 








मा. दीपक रोकडे सर 'आनंददायी शिक्षण', कविता गायन करताना जि.प.शाळा महाळुंगे पडवळ येथे


-------------------------------------------------------------------------------------------------------------

चित्रकला विषय मार्गदर्शन




--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुष्प ९ वे
                                                                                                               दिनांक २० जानेवारी २०१८
रेल्वे  मोटरमन, संगणक तज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या  यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
          गावातील सेवानिवृत्त रेल्वे मोटरमन (चालक )तुकाराम आवटे,  संगणक तज्ञ हनुमंत पर्वत,  सामाजिक कार्यकर्त्या दिपाली शिंदे यांनी आपल्या जीवनातील विविध प्रसंग व आयुष्याची वाटचाल कशी झाली याविषयी विद्यर्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकनाथ आंबटकर होते.
             रेल्वे   मोटरमन (चालक )तुकाराम आवटे यांनी विद्यार्थ्यांना रेल्वे विषयी माहिती सांगत असताना विद्यार्थ्यांनी कमालीची उत्सुकता दर्शविली. ग्रामीण भागातील या बहुतेक मुलांनी फक्त चित्रात व टेलीव्हिजन वरच रेल्वे पहिली आहे. त्यात प्रत्यक्ष ती रेल्वे चालवणारे प्रत्यक्ष असल्यामुळे विद्यार्थ्यांनी रेल्वे विषयी विविध प्रश्न विचारून माहिती घेतली. रेल्वे कशी धावते, तिचा वेग किती असतो. ती एवढी माणसे कशी नेते,अशा विविध प्रश्नाची उत्तरे आवटे यांनी दिली.
        संगणक तज्ञ हनुमंत पर्वत यांनी जग हे विज्ञान युगाकडून संगणक युगाकडे चालले आहे. पदोपदी आपल्याला संगणकाचा वापर प्रत्येक क्षेत्रात होत असताना दिसतोय. तेव्हा यापुढे नोकरी मिळवायची  असेल तर प्रत्येकाला शिक्षणाबरोबरच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.तेव्हा प्रत्येकाने संगणक साक्षर होणे गरजेचे आहे.
सामाजिक कार्यकर्त्या दिपाली शिंदे म्हणाल्या आजची 'स्री' ही स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभी आहे. प्रत्येक क्षेत्रात स्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे.ती कोठेही मागे नाही. तेव्हा सर्व मुलींनी चांगल्या प्रकारे शिक्षण घेवून स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. आज मी स्वतः माझ्या सहकाऱ्या मैत्रिणीं बरोबर बचतगट स्थापन केला असून त्याद्वारे आम्ही स्वतः लहान मोठे उद्योग सुरु केले आहेत. 








--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

"व्यवहारज्ञान देणारे शिक्षण हेच खरे शिक्षण," मनोहर मोहरे
                 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाळुंगे पडवळ शाळेत व्याख्यान देत असताना ते बोलत होते. "दैनंदिन जीवनात आपल्या वाट्याला आलेले अनुभव विद्यार्थ्यांनी दैनंदिनीत लिहून ठेवले पाहिजेत, अशा छोट्या मोठ्या प्रसंगाचे लेखन करण्याच्या सवयीतूनच भावी लेखक घडत असतो. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी मेहनत, चिकाटी, धाडस, प्रयत्न करण्याची वृत्ती असणे गरजेचे आहे. तेव्हा ती गोष्ट साध्य होत असते. शिक्षण असे हवे ज्यातून व्यवहारज्ञान मिळाले पाहिजे, आशा शिक्षणासाठी शाळास्तरावर असे उपक्रम महत्वाचे आहेत. ज्या शिक्षणातून भावी आयुष्यात कसे वागायचे यासाठी चांगले संस्कार तर महत्वाचे आहेत त्याच बरोबर व्यवहारज्ञान महत्वाचे आहेत त्यासाठी मुलांना वेगवेगळे अनुभव येणे महत्वाचे आहे. असे अनुभव प्रत्यक्ष अनुभवातून, वाचनातून, व्याख्यानातून मिळत असतात. त्यासाठी मुलांनी पुस्तके वाचली पाहिजेत. वाचनाला महत्व दिले पाहिजे."
                              प्रसंगी त्यांनी लहान मुलांच्या भावविश्वाशी निगडित विविध कथा, भाषिक खेळ, कार्यानुभव विषयाशी निगडित प्रात्यक्षिके घेतली.






-------------------------------------------------------------------------------------------------------------------------  - To be continue.....

For watching


created by
 Arvind Modhave 
Mahalunge Padwal




1 comment:

  1. आम्हा सर्वांना खरच शिक्षकांची पवित्र भुमिका किति महत्वपुणआहे पवित्रआहे याचि जाणिव व दिश दाखविणारा कार्यक्रम आपल्या सर्व शाळा परिवारांचे मनपुर्वकअभिनंदन .
    भावि कार्यास मनापासुन शुभेच्छा.

    ReplyDelete

animated-boy-image-0053स्कूल चले हम!
animated-arrow-image-0023
सर्व कविता लिंक
��मराठी इयत्‍ता पहिली  
download

��मराठी इयत्‍ता दुसरी 
download

��मराठी इयत्‍ता तिसरी
download
 
 ��मराठी इयत्‍ता चौथी
download

 ��मराठी/हिंदी  इयत्‍ता पाचवी
downlod

��मराठी/हिंदी  इयत्‍ता सहावी
download

��मराठी/हिंदी  इयत्‍ता सातवी
download

आणि

 ✈��इंग्रजी इयत्‍ता पहीली
download

��इंग्रजी इयत्‍ता दुसरी
download

��इंग्रजी इयत्‍ता तिसरी
download

��इंग्रजी इयत्‍ता चौथी
download

��इंग्रजी इयत्‍ता पाचवी
download

��इंग्रजी इयत्‍ता सहावी 
download

��इंग्रजी इयत्‍ता सातवी 
download

सर्व कविता  सहज download करूया
सौजन्य back to zp school 
Sandip Khandagale