इयत्ता चौथी २०२०/२१

E:\photoshop my\rollover.html

Friday 1 September 2017

CCRT हैद्राबाद - “विद्यालयी शिक्षा में हस्तकला का वापर”.









लुप्त होत चाललेल्या कला जोपासणे गरजेचे
भारत देशात पुरातन काळापासून अनेक कला अवगत आहेत. त्या पारंपारिक पद्धतीने त्यांचे जतनही केले जात आहे. परंतु सध्या अशा अनेक कला आहेत की त्या कालानुरूप नामशेष होत चालल्या आहेत, त्या वृद्धिंगत ठेवण्यासाठी सांस्कृतिक स्त्रोत आणि प्रशिक्षण केंद्र, भारत सरकार महत्वाचे काम करत आहे. अशाच एका  १२ दिवसांच्या प्रशिक्षणसाठी हैद्राबाद येथे निवड झाली. प्रशिक्षणाचे नाव होते “विद्यालयी शिक्षा में हस्तकला का वापर”.
सदर प्रशिक्षणात खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. भारत देशात असणाऱ्या विविध राज्यात असणऱ्या विविध हस्तकला याविषयी माहिती मिळाली. तसेच त्याकलांचा वापर, त्या शिकण्याची संधी मिळाली. संपूर्ण देशातील विविध राज्यातील आलेल्या शिक्षकांनी एकमेकांना माहित असलेल्या कलांविषयी माहिती दिली. तसेच तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनखाली महत्वाच्या कलांचे प्रात्यक्षिकही देण्यात आले. व त्या प्रत्येकाने  आपल्या राज्यात विद्यार्थ्यांना त्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी व त्या कला वृद्धिंगत ठेवण्यासाठी प्रेरणा दिली. सदर कालावाधीत  आम्ही मधुबनी, कलमकारी, निर्मल पेंटिंग, बुक बाईंडिंग शिकण्याची संधी मिळाली. विविध संस्कृती, विविध लोककला, विविध भाषेतील लोकगीते तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनखाली शिकायला मिळाली.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध हस्तकलांमध्ये  वारली पेंटिंग, पैठणी साडी , सोलापुरी चादर, सावंत वाडीची खेळणी यासारख्या विविध कलांची माहीती  इतर राज्यातील शिक्षकांना देण्यात आली. माझ्या सोबत पुणे जिल्ह्यातील अरविंद मोढवे (मी), तुषार शिंदे, नामदेव उगले, मच्छिंद्र चासकर, सीताराम गुंजाळ आदी शिक्षक सहभागी झाले होते. प्रत्येक दिवशी प्रत्येक राज्यातील शिक्षकांनी आपल्या राज्यातील सांस्कृतिक कार्यक्रम सादर करावयाचा होता, या प्रसंगी सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे महाराष्ट्राची लोकधारा सादर केली, शिवाजी महाराजांचा पोवाडा, दिंडी, कोळी गीते सादर केली. एकंदर प्रत्येक राज्यात असणारी विविधता जवळून पहाण्याची, समजून घेण्याची संधी यामुळे मिळाली. अशा प्राशिक्षणामुळेच  देशातील हस्तकला प्रत्येक राज्यात शिकवली जाईल व संवर्धन नक्कीच  होईल.


animated-boy-image-0053स्कूल चले हम!
animated-arrow-image-0023
सर्व कविता लिंक
��मराठी इयत्‍ता पहिली  
download

��मराठी इयत्‍ता दुसरी 
download

��मराठी इयत्‍ता तिसरी
download
 
 ��मराठी इयत्‍ता चौथी
download

 ��मराठी/हिंदी  इयत्‍ता पाचवी
downlod

��मराठी/हिंदी  इयत्‍ता सहावी
download

��मराठी/हिंदी  इयत्‍ता सातवी
download

आणि

 ✈��इंग्रजी इयत्‍ता पहीली
download

��इंग्रजी इयत्‍ता दुसरी
download

��इंग्रजी इयत्‍ता तिसरी
download

��इंग्रजी इयत्‍ता चौथी
download

��इंग्रजी इयत्‍ता पाचवी
download

��इंग्रजी इयत्‍ता सहावी 
download

��इंग्रजी इयत्‍ता सातवी 
download

सर्व कविता  सहज download करूया
सौजन्य back to zp school 
Sandip Khandagale