इयत्ता चौथी २०२०/२१

E:\photoshop my\rollover.html

गुगल मॅप - प्रवासात उपयोगी पडणारे App

गुगल मॅप  (ऑफलाइन)   google-maps
विविध नॅव्हिगेशन गॅझेट्सच्या सहायाने प्रवास करणे ही आता नित्याची बाब झाली आहे. परंतु, प्रवासात प्रत्येक वेळी हॅण्डसेटला नेटवर्क मिळेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे मोक्याच्या क्षणी अडचणी उत्पन्न होतात आणि नॅव्हिगेशन गॅझेट जवळ असूनसुद्धा त्याचा फारसा उपयोग होत नाही. प्रवाशांच्या या अडचणीवर गुगलने तोडगा शोधला आहे. आता गुगल मॅप हे फिचर ऑफलाइन मोडमध्येसुद्धा ऑपरेट करता येणार आहे.
काही दिवसांपूर्वी युट्युबच्या ऑफलाइन व्हर्जनची गुगलने मोठ्या प्रमाणात जा​हिरात केली होती. त्याच धर्तीवर भारतातील युझर्ससाठी गुगलने 'गुगल मॅप'चे ऑफलाइन व्हर्जन लाँच केले आहे. भारतातील अनेक युझर्स अजूनही टूजी आणि थ्रीजी नेटवर्कवरच आहेत. त्यामुळे डाउनलोडिंग करताना कनेक्टिव्हिटीसोबतच स्पीडचीही समस्या असते. या अडचणींवर मात करुन ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी तंत्रज्ञान कंपन्या भरपूर मेहनत घेत आहेत. सातत्याने 'नवे काही तरी' शोधण्याच्या या प्रयत्नांमधूनच गुगल मॅपच्या ऑफलाइन व्हर्जनची संकल्पना पुढे आली आहे. इंटरनेट जगतात 'गुगल'हा परवलीचा शब्द आहे. व्यक्तींपासून रस्त्यांपर्यंत कुठलीही गोष्ट गुगलवर शोधता येते हा विश्वास सर्वसामान्य युझर्सला आहे. गुगलचा मोठ्या प्रमाणात वापर होत असला तरी कनेक्टिव्हिटीसारख्या समस्यांमुळे प्रवासादरम्यान गुगल मॅप फारसे प्रभावी ठरत नव्हते. आता मात्र 'ऑफलाइन गुगल मॅप' ही अडचण दूर करणार आहे.
'आतापर्यंत गुगलवरून नियोजित रस्ता शोधण्यासाठी चांगले इंटरनेट कनेक्शन गरजेचे होते. मात्र, आता ठिकाणे शोधणे, रस्त्यांची निवड करणे या बाबी सोप्या होणार आहेत. गुगल मॅपच्या ऑफलाइन व्हर्जनचा भारतातील युझर्सना चांगला फायदा होईल, अशी आम्हाला आशा आहे,' असे गुगल मॅपचे संचालक सुरेन रुचेला यांनी सांगितले.
आपल्याला ज्या भागातून प्रवास करायचा असेल त्या भागाचा नकाशा अॅण्ड्रॉइड स्मार्टफोनवर डाऊनलोड करायचा आणि प्रवासाच्या वेळी इंटरनेट कनेक्ट न करताही रस्ता शोधायचा, अशी ऑफलाइन गुगल मॅपची कार्यपद्धती आहे. गुगल मॅप ऑफइलान सध्या केवळ अॅण्ड्रॉइडवर उपलब्ध असून आयओएस व्हर्जन लवकरच उपलब्ध होणार आहे.

No comments:

Post a Comment

animated-boy-image-0053स्कूल चले हम!
animated-arrow-image-0023
सर्व कविता लिंक
��मराठी इयत्‍ता पहिली  
download

��मराठी इयत्‍ता दुसरी 
download

��मराठी इयत्‍ता तिसरी
download
 
 ��मराठी इयत्‍ता चौथी
download

 ��मराठी/हिंदी  इयत्‍ता पाचवी
downlod

��मराठी/हिंदी  इयत्‍ता सहावी
download

��मराठी/हिंदी  इयत्‍ता सातवी
download

आणि

 ✈��इंग्रजी इयत्‍ता पहीली
download

��इंग्रजी इयत्‍ता दुसरी
download

��इंग्रजी इयत्‍ता तिसरी
download

��इंग्रजी इयत्‍ता चौथी
download

��इंग्रजी इयत्‍ता पाचवी
download

��इंग्रजी इयत्‍ता सहावी 
download

��इंग्रजी इयत्‍ता सातवी 
download

सर्व कविता  सहज download करूया
सौजन्य back to zp school 
Sandip Khandagale